मराठवाडा

हिंगोली : बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत सापडला

अविनाश सुतार

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : घरातून 3 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सिंदगी शिवारातील विहिरीत सापडला. चंद्रकांत संजय गजभारे (वय २१, रा. सिंदगी) असे मृत तरूणाचे नाव आहे. शनिवारी पहाटे पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिंदगी येथील चंद्रकांत संजय गजभारे (वय २१) हा तरुण बुधवारी सकाळी बाहेर जाऊन येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. चंद्रकांत याचा नातेवाईकांकडेही शोध लागला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी परिसरातील आखाडे व विहिरींमध्ये पाहणी करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी सिंदगी शिवारातील एका शेतामध्ये असलेल्या विहिरीजवळ कपडे, स्वेटर व चप्पल आढळून आली.

सदर प्रकार संबंधित शेतकऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितल्यानंतर या प्रकाराची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना देण्यात आली.
आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार मधुकर नागरे, मुलगीर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी विहिरीत पाहणी केली असता त्यात एक मृतदेह दिसून आला. पोलिसांनी आज पहाटे मृतदेह विहिरी बाहेर काढला. तो मृतदेह चंद्रकांत गजभारे याचा असल्याचे स्पष्ट झाले. आखाडा बाळापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT