हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : एका विवाहित महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर हे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची घटना चिखली येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी दीपक दिगंबर बोंढारे यास अटक केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असलेल्या एका 33 वर्षीय महिलेचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ दीपक दिगंबर बोंढारे याने चोरून चित्रित केले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर सातत्याने अत्याचार केला. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पीडित महिलेने दि. 4 जुलैरोजी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी दीपक दिगंबर बोंढारे (रा. चिखली ता. कळमनुरी, जि. हिंगोली) याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 376 ( 2 ) ,(एन), 323, 506 अन्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे करत आहेत.
हेही वाचा