मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर : हतनूर येथे झाड कोसळून कारचे मोठे नुकसान

अविनाश सुतार

हतनूर; पुढारी वृत्तसेवा : हतनूर परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने आज (दि. २८) दुपारी दीडच्या सुमारास झोडून काढले. अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. यात लिंबाचे झाड कारवर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर काही ठिकाणी घरावरील लोखंडी पत्रेही उडून रस्त्यावर पडली. तसेच लिंबाचे झाड कोसळून विदयुत वाहिनी तुटून पडल्या.

हतनूर येथील विठ्ठल रुक्मिणी आणि महादेव मंदिरासमोरील सर्वात मोठे जुने कडू लिंबाचे झाड ग्रामपंचायत सदस्य संतोष साहेबराव करवंदे यांच्या कारवर (एमएच २० ई ई १०१४) कोसळले. यावेळी नागरिक रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळला. हा रस्ता वर्दळी आहे. परंतु, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT