कन्नड; पुढारी वृत्तसेवा- कन्नड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या सदस्य व सरपंचपदाचा निकाल आज जाहीर झाला. या निवडणुकीत मतदारांचा सर्वच राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडे संमिश्र कौल दिसून आला असला तरी भाजपसह शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली आहे.
जनतेतून थेट सरपंच पदाची निवडणूक झाल्याने गावागावांत मोठी चुरस निर्माण झाली होती. निकालाकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांसह जनतेचे लक्ष लागून होते. यात शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) भाजप, स्व.रायभानजी जाधव विकास आघाडी, राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच संजना जाधव समर्थक गटाच्या नेत्यांनी ग्रामपंचायतींवर दावा केला होताे; पण मतदारांनी सर्व पक्षांच्या पारड्यात मतदान टाकले. याशिवाय काही अपक्ष उमेदवारही सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयात मतमोजणी झाली. निकालानंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
गराडा येथील पूजा सचिन राठोड यांना व त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला ५४० मते पडली. त्यानंतर चिठ्ठी द्वारे पूजा राठोड यांचा विजय झाला. मेहगाव येथील सरपंच पदाच्या कल्याणी नागेश कांदे व रेखा गणेश बोंगाने यांनाही ५३९ मतदान झाले होते. चिठ्ठीत रेखा गणेश बोंगाने यांचा विजय झाला.
पळशी खुर्द – सदस्य अंजना अर्जुन काळे, गौरप्रिपी – सदस्य अजबसिंग सुर्यवंशी, खामगाव – सदस्य अप्पासाहेब गायके, वडनेर – सदस्य छायाबाई चव्हाण यांना समान मते पडल्याने चिठ्ठी काढून विजयी झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार मोनाली सोनावणे उपस्थित होते. धीरज राजू राठोड या बारा वर्षीय मुलाच्या हस्ते चिठ्या काढण्यात आल्या.
औराळी – संगीता शिवाजी निकम
आमदाबाद – नरसिंह सीताराम सोनवणे
देवपुळ – लताबाई ज्ञानेश्वर ताठे
हेही वाचा :