Marathwada Gram panchayat Election Result 2022 : सिल्लोड: शिंदे गटाची बाजी, अब्दुल सत्तार यांचे तालुक्यातील वर्चस्वावर शिक्कामोर्तब | पुढारी

Marathwada Gram panchayat Election Result 2022 : सिल्लोड: शिंदे गटाची बाजी, अब्दुल सत्तार यांचे तालुक्यातील वर्चस्वावर शिक्कामोर्तब

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : Marathwada Gram panchayat Election Result 2022 : सिल्लोड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीची मतमोजणी पूर्ण झाली असून सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या निकालात १८ पैकी १३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कृषिमंत्री अब्दुल सत्तार -शिंदे गटाने बाजी मारली असून भाजपाकडे केवळ ५ गावांचा कारभार मतदारांनी सोपवला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची असलेली एकप्रकारची रंगीत तालीम होती. ज्यामध्ये कृषिमंत्री अब्दूल सत्तार शिंदे गटाने एकतर्फी वर्चस्वाला गवसणी घातली असून भवन गटातील ३ पैकी २ ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यात भाजपचे ज्ञानेश्वर मोठे – इद्रिस मुलतानी यांना यश आले आहे.

सिल्लोड तालुक्यातील १८ गावांच्या ग्रामपंचायत मुदत संपलेल्या निवडणुकीसाठी (दि.१८) रविवारी मतदान झाले. या निवडणुकीत मतदार उत्स्फूर्तपणे मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी विक्रमी राहिली. निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी (दि.२०) मंगळवारी शासकीय तंत्रनिकेतन प्रशालेत तहसीलदार विक्रमसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात पार पडली. सरपंचपदासाठी निवडून आलेले नवनिर्वाचित गावचे कारभारी या प्रमाणे आहेत.

Marathwada Gram panchayat Election Result 2022 : निवडणूक जाहीर झालेले निकाल व विजयी उमेदवार तसेच पक्षीय हितसंबंध या प्रमाणे आहेत

कासोद धामणी — दत्तात्रेय काशीनाथ राकडे(शिंदे गट)
बोरगाव बाजार — सय्यद सत्तार बागवान (शिंदे गट )
सारोळा — रेखा मोहन गायकवाड (शिंदे गट )
जाभंई — लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट)
रेलगाव — पंकज जैस्वाल (शिंदे गट)
खुल्लोड — स्वाती भागवान भोरकडे (शिंदे गट)
जलकी बाजार — ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट)
मोढा खुर्द — लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट)
पिंपळगाव पेठ – दिलीप जाधव(शिंदे गट)
पिंपळदरी — पूजा मोहोर (शिंदे गट)
चारनेर – चारनेर वाडी — रविंद्रसिंग बिलावाल राजपूत (शिंदे गट)
शिंदेंफळ — रेखाबाई अक्कलवार (शिंदे गट)
मोढा बु।। वर्षा गणेश हावळे (शिंदे गट)

बोरगाव कासारी – मिनाबाई कौतीक जाधव(भाजप)
निल्लोड — उत्तम शिंदे (भाजपा)
धोत्रा — पद्माबाई ज्ञानेश्वर जाधव (भाजप)
हट्टी – मोहळ — ममता कुलकर्णी (भाजपा)
सावखेडा खुर्द – सावखेडा बु।। काशिनाथ गोरे (भाजपा)

Back to top button