मराठवाडा

परभणी : शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये अनुदान द्या; भारत राष्ट्र समितीचे निवेदन

Shambhuraj Pachindre

मानवत; पुढारी वृत्तसेवा : तेलंगणा राज्यातील शेतकऱ्याप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी पेरणी करता प्रति एकर १० हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर यांचेकडे गुरुवारी (दि.१) करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की , तेलंगणा शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांना पेरणी करीता दरवर्षी एकरी दहा हजार रुपये अनुदान मागील दहा वर्षापासून दिले जाते . परंतु, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पेरणी करता दरवर्षी मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी हे पेरणी करता आर्थिक अडचणीत येऊन स्वतःचे व कुटुंबाचे जीवन उध्वस्त करून आत्महत्या करत आहेत. या संदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी खेडोपाडी जाऊन शेतकऱ्यांच्या जीवनाचा आढावा घेऊन हा अहवाल शासनाला सादर केला आहे.

यामध्ये तेलंगणा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी पेरणी करता एकरी दहा हजार रुपये अनुदान दिल्यास त्यांच्या जीवनात आर्थिक अडचण येणार नाही. लाखो शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. याप्रमाणे राज्य शासनाने या अहवालाची तात्काळ अंमलबजावणी करून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर भारत राष्ट्र समितीचे प्रा. प्रकाश भोसले, तालुकाध्यक्ष हनुमान मसलकर, गणेश सुरवसे, रमेश माने, माऊली निर्वळ, नारायण आवचार, भानुदास कदम, बाळासाहेब काळे, हनुमान तारे यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT