मराठवाडा

हिंगोली : श्रीक्षेत्र शेगावधील गजानन महाराजांची पालखी हिंगोली जिल्ह्यात येणार

अनुराधा कोरवी

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र शेगाव येथून श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूर रवाना झाली असून दि. १६ जून रोजी तिचे हिंगोली जिल्ह्यात आगमन होणार आहे. यात सेनगाव, डिग्रस, जवळाबाजार मुक्काम करुन रविवारी दि. १९ जून रोजी परभणी जिल्ह्यात आगमन होणार आहे. तर पुढे ती शनिवारी १८ जून रोजी जवळाबाजार येथे आगमन होणार आहे. जवळपास दोन वर्षानंतर पंढरपूर मार्गावरील भाविक मंडळीच्या कानावर गण..गण..गणात.. बोते… हे शब्द पडणार आहेत. तर हा पुन्हा मार्ग गजबजणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे तब्बल दोन वर्षानंतर श्रीक्षेत्र शेगाव येथून श्री गजानन महाराजांच्या पालखीचे ६ जून २०२२ रोजी सकाळी ७ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. यानंतर ही पालखी मुक्काम करत दिनांक ८ जुलै २०२२ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त पोहोचणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भाव निर्माण झाल्याने गेल्या दोन वर्षापासून पायी वारी बंद करून अल्प वारकऱ्यांमध्ये आषाढी एकादशी सोहळा साजरा केला जात होता. यानंतर पुन्हा पायीवारी सुरू करण्यात आली आहे. देशातील कानाकोपर्‍यातून विविध गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेनिमित्त जवळपास दोन वर्षानंतर वारकरी मंडळींना हा योग आला आहे.

दरवर्षी विदर्भातील सर्वात मोठी श्री क्षेत्र शेगाव येथील गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जात असते. दोन वर्षानंतर श्री गजानन महाराजांची पालखी ६ जून रोजी २०२२ श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे आषाढी यात्रेनिमित्त रवाना झाली आहे. दिनांक ६ जून रोजी सकाळी ७ वाजता श्री गजानन महाराज पालखीचे प्रस्थान झाले आहे. यानंतर ही पालखी पारस, भौरद, अकोला, वाडेगाव, पातूर, श्रीक्षेत्र डवहा शिरपूर, महसलापेन, रिसोड, सेनगाव, डिग्रस मुक्काम करत शनिवारी (दि. १८ जून) रोजी दुपारी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथून सायंकाळी जवळाबाजार येथे मुक्काम घेणार आहे. मुरलीधर सावजी नवले जैन परिवाराकडून पालखीतील वारकरी मंडळीचे भोजनाचे नियोजन केले आहे. येथील जिल्हा परिषद शाळेत पालखी मुक्कामाचे नियोजन करण्यात आले आहे,

यानंतर रविवारी (दि. १९ जून) रोजी सकाळी पालखी पंढरपूरकडे आडगाव , हटा श्रीक्षेत्र त्रिधारा, परभणी, दैठणा, गंगाखेड मुक्काम, परळी वैजनाथ, आंबेजोगाई, बोरी सावरगाव, कळंब, तेरणा सहकारी साखर कारखाना, उपळा, उस्मानाबाद, श्री क्षेत्र तुळजापूर, ऊळे, सोलापूर, माचणूर मुक्काम करीत ८ जुलै रोजी रात्री श्री शेत्र पंढरपूर मुक्काम घेणार आहे. दिनांक ८ जुलै ते १२ जुलै श्री शेत्र पंढरपूर येथे मुक्काम पालखीचा राहणार आहे. दिनांक १३ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शेगावकडे प्रस्थान होणार असून जवळपास पालखी कुर्डूवाडी, बार्शी ,बीड ,गेवराई ,जालना ,सिंदखेड राजा ,लोणार, मेहकर, खामगाव मार्ग दिनांक ३ ऑगस्ट रोजी श्री शेत्र शेगाव येथे पालखीचे आगमन होणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT