मराठवाडा

Jalna Accident : परतूर रोडवर चारचाकीची दुचाकीला पाठीमागून धडक, चार जण जखमी 

backup backup

परतूर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांची मुलगी प्रेक्षा भांबळे प्रवास करत असलेल्या गाडीने वाटूर – परतूर रोडवर परतूर शहराकडे येणाऱ्या दुचाकीला दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि दोन लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत. (Jalna Accident)

या अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नीचे नाव दत्ता आसाराम तांगडे (वय ३५) आणि वर्षा दत्ता तांगडे (वय ३०) असे असून, ते घनसावंगी तालुक्यातील येवला येथील रहिवासी आहेत. तांगडे दांमत्य रविवारी दुपारी मांडवा देवीचे दर्शन घेऊन परतूरमार्गे रांजणीकडे जात होते. त्यावेळी परतूर शहरातील ग्रामीण राणीवाहेगाव पुनर्वसन जवळ वाटूरकडून परतूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच २२ एएम ८२८२ या चारचाकी कारने त्यांना पाठीमागून जोराची  धडक दिली. या गाडीतून जिंतूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदर विजय भांबळे यांची कन्या प्रेक्षा भांबळे-बोराडे प्रवास करत होत्या. अपघातानंतर प्रेक्षा भांबळे आणि त्यांचा चालक आपली चारचाकी घटनास्थळावर सोडून पळून गेले होते. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Jalna Accident)

अपघाताची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी परतूर पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT