वाशीम, पुढारी वृत्तसेवा : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर किन्हीराजा जवळ ट्रक व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघात झाला. यामध्ये एक व्यक्ती व एक गाय जागीच ठार झाली. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि.10) किन्हिराजा जवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातिल आरेगांव (डोणगांव) येथील रहिवासी गणेश भगवान फुके (45) व त्यांची बहिण संगीता नारायण कांबळे (४०) हे दोघे बहीन भाऊ मंगरूळपीर तालुक्यातील पेडगांव येथे दिलेल्या संगीताच्या मुलीच्या घरी दुचाकीने गेले होते. पेडगांववरुन नागपूर औरंगाबाद या महामार्गावरुन परत येत असताना याच मार्गावरुन भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने (एम एच ३४ एबी ४६१३ )त्यांना धडक दिली.
ही धडक एवढी भंयकर होती की, फूके यांची दुचाकी ट्रकच्या मधोमध अडकून काही अंतरापर्यंत फरफटत गेली. यामध्ये गणेश फूके यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता कांबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून एका हाताची बोटे तुटली तर दुसरा हात शरीरापासून वेगळा झाला. तसेच या अपघातात एक गाय सुध्दा जागीच ठार झाली.
या घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला. जखमींना जवळील प्राथमिक आरोग्य केद्रांच्या रुग्णवाहिकेने वाशिम येथे शासकीय रुग्नालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
.हेही वाचा