मराठवाडा

राणीसावरगाव-अहमदपूर धाब्यावरील जुगार अड्ड्यावर डीवायएसपी पथकाची धाड

अमृता चौगुले

गंगाखेड, पुढारी वृत्‍तसेवा : पिंपळदरी पोलीस ठाणे हद्दीतील राणीसावरगाव- अहमदपूर रस्त्यावरील जयभवानी धाब्यावर डीवायएसपी पथकाने गुरुवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजता धाड टाकली. यामध्ये १२ आरोपींसह एकूण ५ लाख ८१ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, राणीसावरगाव ते अहमदपूर जाणाऱ्या रस्त्यावरील दिगंबर मेकडेयांचे मालकीचे जय भवानी धाब्याचे पाठीमागील रूममध्ये दयानंद संभाजी हाके हा लोकांकडून पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा जुगार चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्‍थळी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता त्यांनी काही इसम हे पत्त्यावर पैसे लावून नावाचा जुगार खेळताना मिळून आले.

पोलीस पथकाने आरोपींना जागीच पकडले. तुकाराम वामन राठोड (रा. रेणुका नगर तांडा), रतन ज्ञानोबा जाधव (रा. इनामी तांडा), बाळू बाबू राठोड (रा.रेणुका नगर तांडा), जालिंदर गोविंद जाधव (रा.रेणुका नगर तांडा), शेख चांद पाशा गफूरसाब (रा.राणीसावरगाव), बन्सी राजाराम पवार (रा.इनामी तांडा), अर्जुन नामदेव राठोड (रा. रेणुका नगर तांडा), रसूल मेहताब पठाण (रा.राणीसावरगाव), दयानंद संभाजी हाके (रा. राणीसावरगाव), बळी खुबाजी राठोड (रा.इसाद), एकनाथ दत्तराव आडे (रा.राणीसावरगाव) व राहुल माधव चव्हाण (रा.धसवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.

आरोपींकडे २२ हजार ८०० रुपये नगदी, मोबाईल आणि वाहने ५ लाख ५९ हजार ८८० रुपये असे एकूण ५ लाख ८१ हजार ८८० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जागा मालक दिगंबर मेकडे यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध केली म्हणून मालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT