तुळजापूर तालुक्यात दोन महिलांवर अत्याचार pudhari photo
धाराशिव

Dharashiv Crime News : तुळजापूर तालुक्यात दोन महिलांवर अत्याचार

नळदुर्ग पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Two women assaulted in Tuljapur Taluka

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये महिलांवर नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दोन नराधमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, एका गावातील २७ वर्षीय महिलेवर फेब्रुवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेऊन वारंवार अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. त्यानुसार बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, २१ वर्ष महिलेवर ३१ मार्च रोजी दुपारी घर घुसून अत्याचार करण्यात आल्यान घटना घडली आहे. ही बाब कोणाव सांगितल्यास व्हिडिओ व्हायर करण्याची धमकी देण्यात आली. प्रकरणीही १ एप्रिल रोजी फिय दाखल करण्यात आली असून संबंधि तरुणाविरोधात बलात्कार तसे अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्य आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढी तपास नळदुर्ग पोलिस करीत आहेत. घटनांतील दोन्ही पीडिता तसे आरोपींची नावे पोलिसांनी गोपन ठेवली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT