Tuljapur is crowded during the Christmas holidays.
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा नाताळ सणाच्या निमित्ताने तुळजापुरात प्रचंड गर्दी उसळली असून मंदिर प्रशासनाकडून भाविकांना प्रवेश देणारा मार्ग नवरात्र महोत्सवाप्रमाणे सुरू केला आहे. या यात्रेवर नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा मार्ग तात्पुरता बदलण्यात आला आहे. चार तासांच्या प्रतीक्षेनंतर धर्मदर्शन होत असल्याचे दिसून आले.
तुळजाभवानी देवीच्या धर्मदर्शन मुखदर्शन करण्यासाठी मध्यरात्रीपासून गर्दी चालू आहे. मध्यरात्री १ वाजता पूजा संपन्न झाल्यापासून धर्मदर्शन आणि मुखदर्शन रांगा सुरू आहेत. या काळात सुमारे २२ तास देवीचे दर्शन भाविकांना खुले आहे. वाढती गर्दी आणि मंदिराचा अरुंद परिसर लक्षात घेऊन प्रशासनाने शारदीय नवरात्र महोत्सवाप्रमाणे दर्शनाच्या रांगा घाटशील पार्किंग मार्गे बीडकर तलाव प्रवेशदारातून चालविले आहेत.
दरम्यान दर्शनासाठी चार ते साडेचार तास वेळ धर्म दर्शनासाठी तसेच दोन ते अडीच तास मुखदर्शनासाठी भाविकांना प्रतीक्षा करावी लागते आहे. भाविक भक्तांना शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असल्यामुळे २७ तारखेपर्यंत देवी शयनावस्थेतून (पलंगावरून) दर्शन दिले जात आहे. या काळात देवीला सुगंधी तेलाचे अभिषेक घातले जातात.