

तुळजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन व त्यांचे चुलत बंधू अशोक मोदी यांनी मंगळवारी (दि. 23) सकाळी कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन यथासांग पूजा, आरती केली.
जशोदाबेन मोदी व बंधू अशोक मोदी यांनी ओळख न सांगता साधेपणाने तुळजापुरात येऊन श्रद्धेने श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. पुजारी सचिन वसंतराव अमृतराव यांनी जशोदाबेन यांच्या पूजेचे पौरोहित्य केले. यावेळी जशोदा बेन मोदी यांनी मातेचरणी फूल अर्पण करून देशाच्या सुख-समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी पुजारी अमृतराव यांनी मातेची प्रतिमा भेट देऊन मोदी परिवाराचा आदर सत्कार केला.