

रत्नापूर : कळंब तालुक्यातील येथील येरमाळा अकरावीत शिकणाऱ्या कॉलेजच्या एका सतरा वर्षीय विद्यार्थ्याला तीन सहकारी विद्यार्थ्यांनी स्टंप, लाकडी काठीने बेदम मारहाण करीत रॅगिंग केल्याची घटना बार्शी तालुक्यातील उकडगाव येथील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयातील वसतिगृहात रविवारी मध्यरात्री १ वाजता घडली. याप्रकरणी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांविरुद्ध येरमाळा जि. धाराशिव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लफिर्यादी १७ वर्षीय पीडित विद्यार्थी हा उकडगाव ता. बार्शी येथील चंद्रभानू सोनवणे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कॉलेजजवळील चोराखळी (ता. कळंब, जि. धाराशिव) हद्दीतील होस्टेलवर राहत होता. रविवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास एका आरोपीने 'तू छाती काढून का चालतो, लय शाईनिंग मारतो का?' असे म्हणून त्याला ५० ते ६० चापटा मारून लाकडी स्टंप, कपड्यांचे हँगर आणि काठीने जबर मारहाण केली.
यावेळी तिथे उपस्थित असलेला दुसऱ्या आरोपीने 'तू मोठ्याने आवाज का करतोस?' असे म्हणत विद्यार्थ्याला मारहाण केली, तर तिसरा आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून पीडित विद्यार्थ्याला जातिवाचक शिवीगाळ करून मानसिक त्रास देत होता. पीडित विद्यार्थ्यावर धाराशित येथे उपचार करण्यात आहे. पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत