Theft News pudhari photo
धाराशिव

Tuljabhavani Temple Theft : गंठण चोरी टोळीतील चार आरोपी जेरबंद

एलसीबीची कारवाई, आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील गंठण चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी असा एकूण 8 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

1 मे रोजी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळजाभवानी मंदिरात एका भाविक महिलेच्या गळ्यातील गंठण चोरी झाल्याप्रकरणी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारचे काही गुन्हे धाराशिव जिल्ह्यात नोंद असल्याने पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी हे गुन्हे तातडीने उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते

15 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वाशी येथील पारगाव टोलनाक्यावरून दोन महिला व दोन पुरुषांना त्यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी साथीदारांच्या मदतीने तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांचे गंठण व मणीमंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींकडून 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण 8 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच तुळजापूर पोलीस ठाण्यातील एक व येरमाळा पोलीस ठाण्यातील तीन असे एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अनिता सुनिल शिंदे, हिराबाई रमेश शिंदे, चिरंजीव रमेश शिंदे व किरण शेषराव शिंदे (सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) अशी आहेत. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT