Dharashiv News : बसस्थानकात रात्री दगडफेक करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात FiIle Photo
धाराशिव

Dharashiv News : बसस्थानकात रात्री दगडफेक करणारे तिघे पोलिसांच्या ताब्यात

मुक्कामी बसवर चढवला होता हल्ला; गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त

पुढारी वृत्तसेवा

Three people who threw stones at the bus station at night have been taken into custody by the police

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा येथील बसस्थानकात घुसून उभ्या बसची तोडफोड केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीने तीन आर ोपींना ताब्यात घेतले असून, गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंगसाठी रवाना झाले होते. यावेळी धाराशिव बसस्थानकावर बसची तोडफोड झाल्याची माहिती या पथकाला मिळाली. तपासादरम्यान तांत्रिक विश्-लेषण व गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, बस तोडफोड करणारे संशयीत व त्यांची कार कळंब येथे असल्याचे समजताच पथकाने तात्काळ कारवाई करत कळंब येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे साईनाथ गणेशराव सावंत (वय २५, रा. गोर्था उमरी, जि. नांदेड), श्रावण उर्फ पंपु राजेंद्र शिंदे (वय २५, रा. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) व अमोल भिमराव भोंग (वय २४, रा. राहेगाव, जि. नांदेड) अशी आहेत.

विचारपूस केली असता आरोपींनी सांगितले की, त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष मागील काही दिवसांपासून तांदुळवाडी (ता. कळंब) येथे उपोषणास बसले असून, त्याची दखल शासनाकडून घेतली जात नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी धाराशिव बसस्थानकावर उपोषणाचे कागद चिकटवून उभ्या असलेल्या बसवर निषेधार्थ दगडफेक करून नुकसान केले. या गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच २५ एएस ५१४२) जप्त करण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी आरोपींना आनंदनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT