

zp pc election There is a large crowd of candidates in Dharashiv
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ५५ जिल्हा परिषद गट व ११० पंचायत समिती गणांसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी उसळली. साडेचार वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे.
बुधवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष इच्छुकांनी तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी केली. अद्याप महायुती व महाविकास आघाडीची अधिकृत घो षणा किंवा जागावाटपाचा तपशील जाहीर न झाल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
त्यामुळे जोखीम न पत्करता बहुतांश इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारपर्यंत जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी तालुकानिहाय दाखल झालेल्या अर्जाची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषद-`साठी ६७ व पंचायत समितीसाठी ५२, तुळजापूरमध्ये ४१ व ५८, भूममध्ये ३२ व ३०, परंड्यात ६ व २, उमरग्यात २७ व २५, वाशीत १४ व ६, लोहारामध्ये ११ व १९ तर कळंब तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ६२ व पंचायत समितीसाठी ६७ अर्ज दाखल झाले आहेत.