Dharashiv News : जेवळीच्या गुरुसिद्धेश्वर मठात सहस्र दीपाराधना file photo
धाराशिव

Dharashiv News : जेवळीच्या गुरुसिद्धेश्वर मठात सहस्र दीपाराधना

शेकडो पणत्यांनी परिसर उजळला, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती

पुढारी वृत्तसेवा

Thousands of lamps offered at Gurusiddheshwar Math in Jevali

लोहारा, पुढारी वृत्तसेवा : कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील जेवळी येथील श्री गुरुसिद्धेश्वर विरक्त मठात मंगळवारी (ता. २४) पारंपरिक सहस्र दीपाराधना कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. मठाधीश म.नि.प्र. गुरु गंगाधर महास्वामीजी यांच्या सान्निध्यात झालेल्या या सोहळ्यात शेकडो पणत्यांच्या प्रकाशाने मठ परिसर उजळून निघाला. यावेळी जेवळीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जीवनातील अज्ञान आणि दुःखाचा अंधकार दूर होऊन सुख-समृद्धीचा प्रकाश नांदावा, या भावनेतून दरवर्षी मठात दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. सायंकाळी महास्वामीजींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मठाचे शिष्य पोलीस कॉन्स्टेबल रविराज मडोळे यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. नवनिहाळ (जि. कलबुर्गी) येथील श्रीनाथ बिरादार, विजय बिरादार, नागराज बिरादार, मंजुनाथ बिरादार, संगप्पा महागाव, सतीश बिरादार आणि गोरखनाथ बिरादार यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी, संचालक दौलप्पा तोरकडे, पंचायत समिती सदस्य नागनाथ पाटील, सरपंच मारुती कार्ले, वैभव पवार, मल्लिनाथ डिग्गे, शिवराज चिनगुंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संजय तांबडे, सोमनाथ बिराजदार, रविराज सोळशे, उमाकांत पणुरे, रोहित कारभारी, योगीराज सोळशे, वेदांत धरणे, ओमकार कारभारी, सचिन हुळमजगे, राहुल गुरव यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT