Dharashiv News : मायक्रो फायनान्सच्या मनमानी वसुलीला चाप लावा : आ. पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणी

मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या मनमानी कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात
dharashiv news
Dharashiv News : मायक्रो फायनान्सच्या मनमानी वसुलीला चाप लावा : आ. पाटील यांची महसूल मंत्र्यांकडे मागणीfile photo
Published on: 
Updated on: 

Put a check on the arbitrary recovery practices of microfinance institutions: MLA Patil’s demand to the Revenue Minister

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी वित्तीय संस्थांकडून होणाऱ्या मनमानी कर्जवसुलीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, तसेच यासंदर्भात ठोस शासन निर्णय काढावा, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

dharashiv news
Parli Vaijnath News | चांदापूर रस्त्यावरील श्री साई मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद

धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कर्जाचे हप्ते वसूल करण्यासाठी प्रतिनिधींकडून वारंवार दूरध्वनी करणे, घरी जाऊन तगादा लावणे, धमकावणे, कुटुंबीयांसमोर अपमानित करणे आणि मानसिक दबाव निर्माण करण्याच्या तक्रारी वाढत आहेत. विशेषतः महिला बचत गटांतील सदस्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

अनियमित पाऊस, अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत हप्ते थकल्याने कर्जदारांना अपमानास्पद वागणूक देणे चुकीचे असल्याचे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. केवळ तोंडी सूचना देऊन हा प्रश्न सुटणार नसून, वसुली प्रक्रियेवर नियंत्रण आणणारा लेखी आदेश आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

dharashiv news
Beed Accident | आयशर टेम्पो - स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

वसुली प्रतिनिधींच्या कामकाजावर नियंत्रण, धमकावण्यास प्रतिबंध, तक्रार निवारण यंत्रणा आणि नियमभंग करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी करण्यासह शासन निर्णय काढण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.