Dharashiv Crime News : भूम शहरात एटीएम फोडून लाखोंची चोरी, CCTV मध्ये घटना कैद, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह File Photo
धाराशिव

Dharashiv Crime News : भूम शहरात एटीएम फोडून लाखोंची चोरी, CCTV मध्ये घटना कैद, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सदर घटनेमुळे भूम शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Theft lakhs of rupees breaking ATM in Bhum city, incident captured CCTV

भूम : पुढारी वृत्तसेवा

भूम शहरातील पार्डी रोडवरील खुशी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यामध्ये लाखो रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना अडीच ते पावणे दोनच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच भूम पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विशेष बाब म्हणजे, संबंधित एटीएमची देखभाल खासगी कंपनीकडे सोपवण्यात आली असल्यामुळे तेथे कोणताही सुरक्षा रक्षक नियुक्त नव्हता. त्यामुळे चोरट्यांना कोणताही अडथळा न येता एटीएम फोडणे शक्य झाले.

चोरी झालेल्या रकमेची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भूम येथे दाखल झाल्यानंतरच चोरीच्या रकमेबाबत स्पष्टता येणार आहे. मात्र, एटीएममध्ये लाखो रुपयांची रोकड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस त्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर घटनेमुळे भूम शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, प्रशासनाने रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. पोलीस पुढील तपास करत असून, लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT