Mahavitaran Smart Meter : स्मार्ट विद्युत मीटरचा ग्राहकांना 'स्मार्ट' शॉक Pudhari News Network
धाराशिव

Mahavitaran Smart Meter : स्मार्ट मीटरचा शॉक : बिलांमुळे वीज ग्राहक संतप्त

जुने मीटर बसवण्याची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

The Smart Meter Shock: Electricity Consumers Outraged Over Bills

विकास उबाळे

कसबे तडवळे : स्मार्ट मीटरच्या विरोधात वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. गावातील नागरिकांनी स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्याची मागणी लावून धरली आहे.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलामध्ये अचानक वाढ झाल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. अत्यल्प वापर असतानाही भरमसाठ बिल येत असल्याने घरगुती आर्थिक बजेट कोलमडले आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. काही ग्राहकांनी तर फक्त एक फॅन व दोन ट्यूब वापरूनही कारखान्याइतके बिल येत आहे, असा संताप व्यक्त केला.

दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून लागू करण्यात आलेल्या 'ऑटो डिस्कनेक्ट' प्रणालीमुळे थकीत बिल असल्यास थेट वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे समोर आले आहे. ही प्रक्रिया मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयातून केली जात असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांनी या निर्णयात आमच्या पातळीवर काहीही बदल करता येत नाही, असे सांगत वरिष्ठांकडे बोट दाखवले आहे.

मात्र, ग्राहकांनी वीज वितरण कंपनीवर बिलाच्या माध्यमातून लूट सुरू आहे, असा गंभीर आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर गावातील काही वीज ग्राहक महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत असून, वीज बिल कमी करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे भविष्यात प्रीपेड स्मार्ट मीटर प्रणाली लागू करण्याच्या दिशेने ही पावले टाकली जात आहेत का, असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT