Yedeshwari Devi : येडेश्वरी देवीच्या यात्रेची धामधूम सुरू; व्यापाऱ्यांची उपस्थिती ! file photo
धाराशिव

Yedeshwari Devi : येडेश्वरी देवीच्या यात्रेची धामधूम सुरू; व्यापाऱ्यांची उपस्थिती !

येथील श्री येडेश्वरी यात्रा गुरुवारपासून (ता. २) सुरवात होत आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत.

पुढारी वृत्तसेवा

The hustle and bustle of the Yedeshwari Devi fair is underway; merchants are in attendance!

येरमाळा, पुढारी वृत्तसेवा: येथील येथील श्री येडेश्वरी यात्रा गुरुवारपासून (ता. २) सुरवात होत आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यावर्षी जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाने यात्रा काळात वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून येरमाळामार्गे जाणाऱ्या अवजड वाहन बाह्यवळण २ ते ५ एप्रिल दरम्यानपर्यंत केली आहे. तसे वाहतूक व्यवस्थेतील बदल यात्रा परिसरात दिशादर्शक फलक, नकाशे जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी प्रकाशित केले आहे.

राज्यातील भाविकांसह यात्रेसाठी विविध व्यावसायिक दाखल झाले आहे. हॉटेल, कोल्ड्रिंक्स, ज्युसवाले, आइस्क्रीम, रसवंती, फळाची, किराणा, नारळ, मिठाईवाले, भांडी, प्रसादाची दुकाने, दागिन्यांची, खेळण्याची, दुकाने तसेच मनोरंजनाचे दोन रहाटपाळणे, मौत का कुआ, ब्रेकडान्स, झुले, हवेची घसरगुंडी असे विविध व्यावसायिक यात्रेसाठी दाखल झाले आहेत.

कायदा सुवस्था व गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये. याशिवाय गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारी, महिला भाविकांच्या अंगावरील दागिने चोरीच्या प्रकाराला आला घालण्यासाठी येडेश्वरी मंदिर रस्ता, पालखी मार्ग, गावातील मुख्य चौक, बसस्थानक आमराईरीतील पालखी मार्ग, आमराई यात्रा परिसरात तर चौरस्त्यावरील उड्डाण -पूलापर्यंत असे परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यात्रा यंदाही सीसीटीव्हीच्या नियंत्रणात निर्विघ्न पार पडणार असून यात्रा काळात अनुचित प्रकारावर नियंत्रण येणार आहे. पहिल्याच पौर्णिमेला भाविकांची गर्दी होईल असे चित्र दिसत आहे. येडेश्वरी मंदिर परिसर प्रचंड गर्दीने फुलून गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT