पालकमंत्री प्रताप सरनाईक  File Photo
धाराशिव

Dharashiv News : ३१९ कोटी रुपयांच्या प्रारुप वार्षिक आराखड्यास मंजुरी

जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिला जाईल : पालकमंत्री सरनाईक

पुढारी वृत्तसेवा

The draft annual plan of ₹319 crore has been approved.

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मागील वर्षी जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ग्रामीण भागातील रस्ते व पुल मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त झाले असून शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी तसेच जिल्ह्यात मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आवश्यक तो निधी कमी पडू देणार नाही,

पालकमंत्री सरनाईक यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. या बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ३१९ कोटी ६७ लाख रुपयांच्या प्रारूप वार्षिक योजनेस मंजुरी देण्यात आली. या बैठकीस जिल्हा नियोजन समिती सभागृह, धाराशिव येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी उपस्थित होते.

व्हिडिओ कॉन्फरन् सद्वारे आमदार राणाजगजितसिंह पाटील सहभागी झाले होते. तसेच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे हे पालकमंत्र्यांच्या दालनात उपस्थित होते. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोखर, निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश काळे यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. सरनाईक म्हणाले की, जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र कमी असून ते वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी 'हरित धाराशिव' मोहिमेअंतर्गत मागील वर्षी एका दिवसात १५ लाख वृक्ष लागवड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

लागवड केलेली सर्व रोपे आज जिवंत असून त्यांचे योग्य संगोपन सुरू आहे. यावर्षीही या मोहिमेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पूरपरिस्थितीमुळे खराब झालेल्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच नावीन्यपूर्ण योजना अंतर्गत नळदुर्ग किल्ल्यात म्युझिकल फाउंटन, विठ्ठलाची मूर्ती तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्क्रीन द्वारे दाखविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच धाराशिव शहराजवळील हातलाई तलाव येथे म्युझिकल फाउंटन व विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात येणार आहे. तुळजापूर येथील पाचुंबा लेक येथे वॉटर स्पोर्ट, ५१ फूट उंच विठ्ठलाची मूर्ती व म्युझिकल फाउंटन उभारण्यात येणार असून यामुळे जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT