Sharad Pawar Pudhari
धाराशिव

Sharad Pawar Marathwada Drought Visit : शरद पवार दोन दिवसांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

धाराशिव तसेच बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : मराठवाड्यासह धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार हे २ आणि ३ नोव्हेंबर रोजी मराठवाड्याच्या दुष्काळी दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते धाराशिव तसेच बीड जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, २ नोव्हेंबर रोजी ते परंडा आणि बार्शी तालुक्यांतील दुष्काळग्रस्त भागांना भेटी देतील. थेट शेताच्या बांधावर जाऊन खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता याबाबत ते शेतकऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. या पाहणीनंतर धाराशिव येथे त्यांचा मुक्काम असणार आहे. दुसऱ्या दिवशी, ३ नोव्हेंबर रोजी ते कळंब आणि बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी करतील.

पिकांचे नुकसान अन् चाऱ्याच्या प्रश्नावर चर्चा

खा. शरद पवार यांच्या या दोन दिवसांच्या नियोजित दौऱ्यात कोरड्या दुष्काळामुळे होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जिरायत व बागायत पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला जाणार आहे. ऐन हिवाळ्याच्या तोंडावर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, सरकारकडून तातडीने मदत मिळण्यासाठी आणि विमा कंपन्यांकडून भरपाई मिळवून देण्यासाठी या दौऱ्याच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT