Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याकंडाचा तब्बल २० वर्षांनी आज निकाल लागणार होता. आज या प्रकरणी निकाल लागणार होता. त्यामुळं पद्मसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर या दोन्ही कुटुंबियांना न्यायाची अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने पुन्हा एकदा निकाल देणं टाळत पुढची तारखी दिली. न्यायालायने निकाल देण्यासाठी अजून काही दिवस लागतील म्हणत २० जूनची तारीख दिली.
दरम्यान, निकाल ऐकण्यासाठी दिवंगत पवनराजे यांचे पुत्र खासदार ओमराजे निंबाळकर आणि ज्यांच्यावर पवनराजेंची हत्या केल्याचा आरोप होता ते पद्मसिंह पाटील दोघेही न्यायालयात हजर होते. पद्मसिंह पाटील हे प्रकृती अस्वस्थ्यामुळं रूग्णवाहिकेतून न्यायालयात आले होते.
आज तब्बल २० वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागणार या आशेने आमोराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात,
20 वर्षे 13 दिवस संघर्षाची , अपेक्षा न्यायाची. माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा. हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे..! आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आज येणाऱ्या या निकालाकडे आमचे दोन्ही कुटुंबीय आस लाऊन न्यायाची अपेक्षा करत आहेत. न्यायाला उशीर झाला आता त्यावर बोलण्यापेक्षा आज तरी राजेसाहेबांच्या व समद काझी यांच्या खुन्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे.