पोलिस दलात नव्या वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण file photo
धाराशिव

पोलिस दलात नव्या वाहनांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पोलिस दलाची कार्यक्षमता, गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला

पुढारी वृत्तसेवा

New Vehicles Inducted into the Police Force at the Hands of the Guardian Minister

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पोलिस दलाची कार्यक्षमता, गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नव्या वाहनांचे लोकार्पण महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांची प्रमुख उपस्थिती होती.

योजना जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) सन २०२५-२६ च्या निधीतून ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे पोलीस विभागाच्या दैनंदिन कामकाजासह विशेष बंदोबस्त व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. पोलिस दलासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या वाहनांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासाठी ५ स्कॉर्पिओ क्लासिक वाहने, प्रथम प्रतिसाद पथक (First Mobile) साठी ६ बोलेरो निओ वाहने, डायल ११२ अंतर्गत दुय्यम प्रतिसाद पथकासाठी १४ बोलेरो बेसिक मॉडेल वाहने तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी १ अशोक लेलँड ट्रकचा समावेश आहे. ही वाहने पायलटिंग, एस्कॉर्ट सेवा, व्हीआयपी बंदोबस्त, जयंती उत्सव, यात्रा बंदोबस्त तसेच विशेष सुरक्षा नियोजनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

नव्या वाहनांमुळे घटनास्थळी जलद पोहोचणे, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत, कायदा व सुव्यवस्था राखणे आणि मोठ्या प्रमाणावरील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये प्रभावी समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.

विशेषतः डायल ११२ आणि प्रथम मोबाईल सेवांसाठी उपलब्ध होणारी वाहने नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित प्रतिसाद देण्यास उपयुक्त ठरणार असून ग्रामीण व शहरी भागातील पोलीस यंत्रणा अधिक बळकट होईल.

आपत्ती व्यवस्थापनासाठी उपलब्ध ट्रकमुळे नैसर्गिक आपत्ती, दुर्घटना किंवा बचावकार्याच्या वेळी आवश्यक साधनसामग्री त्वरीत पोहोचविणे शक्य होणार आहे. या वाहनांच्या लोकार्पणामुळे पोलीस दलाची आधुनिकता वाढून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक सक्षम, सज्ज आणि प्रभावी यंत्रणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT