Jalna News : पोलिस दलासाठी दोन नवीन सर्व्हेलन्स वाहने

संवेदनशील परिस्थितीत ३६० अंश फिरणारे आधुनिक कॅमेरे
Jalna News
Jalna News : पोलिस दलासाठी दोन नवीन सर्व्हेलन्स वाहनेfile photo
Published on
Updated on

Two new surveillance vehicles for the police force

जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना पोलीस दलात दोन नविन अत्याधुनिक सव्हॅलन्स वाहने उपलब्ध झाले आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या अत्याधुनिक बसेसमुळे बंदोबस्त, मोर्चे, आंदोलन आणि संवेदनशिल प्रसंगी प्रभारी निरीक्षक व नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. या वाहनांचे उदघाटन विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले.

Jalna News
Tur Dal Market Rate : कृषी बाजारात तुरीला 8650 उच्चांकी भाव

मुंबई येथील प्रशासन विभागाचे अपर पोलीस महासंचालकांच्या माध्यमातुन जालना जिल्हा पोलीस दलासाठी दोन अत्याधुनिक सर्व्हेलन्स बस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याचा वापर बंदोबस्त, मोर्चे, आंदोलन आणि संवेदनशिल परिस्थितीत ३६० अंशात फिरणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे नजर ठेवता येणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या अत्याधुनिक बसेसमुळे बंदोबस्त, मोर्चे, आंदोलन आणि संवेदनशिल प्रसंगी प्रभारी निरीक्षक व नियंत्रण ठेवणे अधिक सुलभहोणार आहे.

सव्हॅलन्स बस पोलीस दलाच्या कार्यपद्धतीनुसार आवश्यक ते बदल करुन विशेष रित्या सुसज्ज करण्यात आलेल्या आहेत. या बसमध्ये चारही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असुन, त्याद्वारे परिसरावर सर्वदुर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या बसेस विशेष उपकरणांनी सुसज्ज आहेत.

Jalna News
Jalna Crime : धारदार हत्याराने युवकाचा खून

बसच्या आतुन शिडीची सुविधा असुन, छतावर सहज उघडता येतील अशी फोल्डेबल रेलिंग बसविण्यात आली आहेत. यामुळे काही क्षणांतच निरीक्षणासाठी सुरक्षित जागा तयार करता येते. ऊन पावसांपासुन संरक्षण करण्यासाठी छत्री बसविण्यासाठी स्वतंत्र व नियोजित जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या मंचावर उभे राहुन पोलीस अधिकारी व अंमलदार प्रभावीपणे बंदोबस्ताचे निरीक्षण करु शकतील.

या अत्याधुनिक सव्र्व्हेलन्स बसचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक जान्हवी शेखर हे हजर होते. नवीन वाहनात उच्च दर्जाचे सिसिटीव्ही कॅमेरे, फ्लड लाईट प्रणाली, लाईव्ह मॉनटरिंग, पब्लीक अॅड्रेस सिस्टम तसेच लाईव्ह स्ट्रिमींगची सुविधा उपलब्ध आहे.

कायदा सुव्यवस्था सक्षम होणार या आधुनिक वाहनांच्या समावेशामुळे जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, सुरक्षित व तंत्रज्ञान सक्षम होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news