Mahavikas Aghadi's representation of temple demands to Guardian Minister Pratap Sarnaik
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीच्या दर्शन घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने वेगवेगळ्या २६ मागण्यांचे निवेदन काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले.
अत्यंत प्राचीन मंदिर असणाऱ्या तुळजापूर तुळजाभवानी मंदिराचा जन्मोतदार करण्यासाठी राज्य सरकारने आराखडा तयार केला आहे, परंतु त्यामध्ये अनेक बाबींची नोंद केलेली नाही. त्यामुळे येथील पुजारी व्यापारी आणि शहरवासीय यांना विश्वासात घेऊन विकास आराखडा व अशी मागणी तुळजापूर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, ऋषिकेश मगर, शिवसेना नेते श्याम पवार, सुधीर कदम, राहुल खपले, नागनाथ भांजी, तौफिक शेख, गोरक्ष पवार, रणजीत इंगळे, रामचंद्र ढवळे, उत्तम अमृतराव, किरण यादव, अमर चोपदार, गोरक्ष पवार, सुरेश कोकरे, संदीप कदम, विकास चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने केली आहे. या निवेदनामध्ये तुळजाभवानी मंदिरातील अत्यंत महत्त्वाचे धार्मिक विधी महाविकास आघाडीने पालकमंत्री सरनाईक यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत.
यामध्ये ओटी भरण विधी, अभिषेक पूजा, सिंहासन महापूजा, जागरण गोंधळ विधी, जावळ विधी, कुंकवाचा सडा, विधी, देवीला फुल लावणे, लग्न विधी, फुलाचे घर , पानाचे घर लावणे, आराध बसणे, कुंकवाचा सडा, देवीला दंडवत घेणे, माळ परडी विधी, पुरणपोळी नैवेद्य, दहीभात नैवेद्य आणि मटणाचा नैवेद्य, भाविकांना पिण्याचे पाणी सार्वजनिक मुतारी वैद्यकीय सेवा देण्यात यावी.
१०८ फुटांचे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी देवी भवानी तलवार मूर्ती उभारण्यात येऊ नये, घाटशिळ पार्किंग पुन्हा नगरपरिषदेला वर्ग करावी, १२४ धर्मशाळा येथे भक्तनिवास चालवावे, धर्मशाळेची जागा हॉस्पिटलला देऊ नये, पुजाऱ्यांची घरे वगळून विकास करण्यात यावा, मंदिरातील उपदेवतांची मंदिरे पूर्वीच्या जागी उभारण्यात यावीत, होम हवन सारखे धार्मिक विधी करून पैशाची उधळपट्टी करू नये अशा मागण्यांचे सविस्तर निवेदन पालकमंत्र्यांना दिले आहे,