धाराशिवमधील १४० कोटींच्या रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करा

महाविकास आघाडीचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना इशारा
Dharashiv News
धाराशिवमधील १४० कोटींच्या रस्त्यांची कामे तत्काळ सुरू करा File Photo
Published on
Updated on

Immediately start the work of roads worth 140 crores in Dharashiv

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या १४० कोटींच्या मंजूर कामांना तत्काळ सुरुवात करावी, तसेच शहरालगत असलेला कचरा डेपो अन्यत्र हलवावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. नियमांनुसार तीन महिन्यात कामांना सुरुवात होणे अपेक्षित असताना, दीड वर्ष उलटूनही कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, नागरिकांचे हाल सुरूच आहेत.

Dharashiv News
Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan | अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन धाराशिवला व्हावे..

३० एप्रिल रोजी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणस् थळी भेट देऊन रस्त्यांची कामे लवकरच सुरू केली जातील व कचरा डेपो अन्यत्र हलवण्यात येईल असे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, अडीच महिने उलटूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याने, दिलेल्या आश्वासनाचा विसर मंत्री महोदयांना पडला असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली.

त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शहरालगत असलेला कचरा डेपो दुर्गंधी आणि धुरामुळे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. श्वसनाचे विकार आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कचरा डेपो इतरत्र हलवून त्यावर प्रक्रिया करण्याची मागणी महाविकास आघाडीने पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली.

Dharashiv News
India World of Records : वृक्षारोपणाचे इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड, १५ लाख वृक्षरोपण, पालकमंत्र्यांकडून कौतुक

या शिष्टमंडळात शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, नगरसेवक खलील सय्यद, जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर, शेखर घोडके, काँग्रेस शहर प्रमुख अग्निवेश शिंदे, सिद्धार्थ बनसोडे, तुषार निंबाळकर, राणा बनसोडे, गणेश असलेकर, इस्माईल शेख, रोहित निंबाळकर, ड. मनीषा पाटील, अशोक पेठे, श्यामल पाटील, सरोजिनी जाधव, पंकज पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news