डिकसळ : गावात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहेत.  pudhari photo
धाराशिव

Dharashiv News : ...अन्‍यथा ग्रामपंचायतीसमोर कचरा टाकण्याचा इशारा

डिकसळ : विविध भागांत कचऱ्याचे ढीग, नागरिकांत संतापाचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

कळंब : डिकसळ ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर, सम्राट अशोकनगर, एकतानगर, फरीदनगर, एस.टी. कॉलनी तसेच ढोकी रोड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कचऱ्याची नियमित उचल होत नसल्याने दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वस्ती व रहिवासी भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य इम्रान हाजी नजमोद्दीन मुल्ला, मुबीन बशीर मनियार तसेच दयावान प्रतिष्ठानचे सचिव अभय गायकवाड यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनासोबत कचरा साचलेल्या ठिकाणांची छायाचित्रेही जोडण्यात आली आहेत.

गणेशनगर, सम्राट अशोकनगर, एकतानगर, फरीदनगर, एस.टी. कॉलनी व ढोकी रोड परिसरातील कचरा तातडीने उचलून स्वच्छता करावी, तसेच कचऱ्याची नियमित उचल करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाने सात दिवसांत संबंधित भागातील संपूर्ण कचरा उचलून परिसर स्वच्छ न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा आणून तीव्र निषेध नोंदवू, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला यांनी दिला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

गणेशनगर, सम्राट अशोकनगर, एकतानगर, फरीदनगर, एस.टी. कॉलनी आणि ढोकी रोड परिसरातील कचरा तातडीने उचलण्यात यावा, परिसराची स्वच्छता करण्यात यावी आणि कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT