Dharashiv Yedshi Fire Tragedy pudhari
धाराशिव

Dharashiv Yedshi Fire Tragedy: पणत्या ठरल्या निमित्त? येडशीत भीषण अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू

दिवाळीनिमित्त घरात आणि दुकानात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

Anirudha Sankpal

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा

दिवाळीच्या सणादरम्यान येडशी येथे घडलेल्या भीषण अग्नितांडवात एकाच कुटुंबातील सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. किराणा दुकानाला लागलेल्या आगीत उत्तम त्रिंबक करंडे, चंद्रकला उत्तम करंडे, गोविंद उत्तम करंडे, ज्योती गोविंद करंडे, गायत्री गोविंद करंडे आणि सिद्धी गोविंद करंडे यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने येडशीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

पणत्यांमुळे लागली आग?

दिवाळीनिमित्त घरात आणि दुकानात लावलेल्या पणत्यांमुळे आग लागल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. किराणा दुकानातील साहित्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला. त्यातून निर्माण झालेल्या धुरात गुदमरून सहाही जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गावकऱ्यांची घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. आग आटोक्यात आणण्यासाठी आणि बचावकार्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने करंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT