FDA Raid Dharashiv: धाराशिवमध्ये २ हजार किलो मिठाईचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करताय? मग जरा सावधान! धाराशिव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने खवा, रबडी आणि गुलाबजाम स्पेशल मिक्सच्या साठ्यावर मोठी कारवाई केली आहे.
FDA Raid Dharashiv
FDA Raid DharashivFile Photo
Published on: 
Updated on: 

FDA Raid Dharashiv

रत्नापूर : दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करताय? मग जरा सावधान! धाराशिव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने खवा, रबडी आणि गुलाबजाम स्पेशल मिक्सच्या साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. रत्नापूरजवळ (ता. कळंब) सोलापूर-धुळे महामार्गावर पिकअप वाहनावर छापा टाकून तब्बल २ हजार ९१६ किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला.

दरम्यान, या कारवाईनंतर कथित आर्थिक व्यवहाराची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. या चर्चेमुळे कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

FDA Raid Dharashiv
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : सुंदरवाडीत २० लाखांचे 'पतंजली' तूप जप्त ! लासूरच्या तेल रिपॅकिंग युनिटचा परवाना निलंबित

रत्नापूरजवळ केलेल्या कारवाईत ८३८ किलो रबडी आणि २ हजार ७८ किलो गुलाबजाम स्पेशल मिक्स असा एकूण २ हजार ९१६ किलो साठा जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याची माहिती आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हा संपूर्ण साठा सीलबंद करून पुढील आदेशापर्यंत ताब्यात ठेवला आहे. तसेच, भूम तालुक्यातील आंबी येथे देखील अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून तब्बल १ हजार ८०० किलो खवा जप्त केला. या खव्याची किंमत सुमारे सहा लाख रुपये असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी फंदी यांनी दिली. दुसऱ्या एका कारवाईत, येरमाळा येथे सांगली आणि कोल्हापूर येथून पिकअप वाहनातून आणली जात असलेली तब्बल तीन टन रबडी प्रशासनाच्या पथकाने पकडली. या रबडीची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते.

अशा प्रकारे आंबी, येरमाळा आणि रत्नापूरजवळ करण्यात आलेल्या तीन कारवायांमध्ये एकूण ७ हजार ७१६ किलो खवा, रबडी आणि गुलाबजाम स्पेशल मिक्सचा साठा जप्त करण्यात आला असून, एकूण सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

FDA Raid Dharashiv
Hingoli FDA Raid | वसमतमध्ये हळद पावडर कंपनीवर FDA चा छापा; ६०.५० लाखांचा साठा जप्त, परवाना रद्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.