Dharashiv Crime | अपहरण झालेल्या तरुणीची अंबाजोगाईतून सुखरूप सुटका; कळंब पोलिसांची कारवाई

पोलीस हवालदार गणेश वाघमोडे यांची धाडसी कामगिरी
Girl Kidnapped Case
Girl Kidnapped Case Pudhari
Published on: 
Updated on: 

Kidnapping Case Kalamb Dharashiv

कळंब : घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करत कोयत्याचा धाक दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याच्या गंभीर प्रकरणात कळंब पोलिसांनी तातडीने कारवाई करत अपहरण झालेल्या तरुणीचा शोध घेतला. तांत्रिक तपासाच्या आधारे जीपीएस लोकेशन मिळवत पोलिसांनी अंबाजोगाई (जि. बीड) येथील खदानीजवळ आरोपींच्या वाहनाचा शोध घेत तरुणीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी (दि. ६) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अभिजित ऊर्फ तन्या अर्जुन नवाट (रा. कोठाळवाडी), किरण भागवत तुपारे (रा. बोरगाव, ता. कळंब), अजय रामकिसन माने (रा. परळी रोड बायपास, कळंब) व अन्य एका व्यक्तीने संगनमत करून फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. जातीवाचक शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली आणि एमएच २० डीव्ही ०३५७ क्रमांकाच्या वाहनातून त्यांचे अपहरण केले.

Girl Kidnapped Case
Dharashiv News : राजू शेट्टींच्या आंदोलनाला पाठिंबा देत भूम येथे शेतकऱ्यांचा रास्ता रोको

या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलीस ठाण्याचे पथक तातडीने तपासासाठी रवाना झाले. पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी वाहनातील जीपीएस प्रणालीच्या आधारे लोकेशन मिळवून ते सातत्याने पथकाला कळविले. त्यानुसार पोलिसांनी पाठलाग करत अंबाजोगाई येथील एका खदानीजवळ वाहन गाठले.

यावेळी वाहनात आरोपी तरुणीला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच पोलीस हवालदार गणेश वाघमोडे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आरोपीवर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Girl Kidnapped Case
Dharashiv News : तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याने परत केली पाच हजारांची दुष्काळी मदत

या प्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, पोलीस उपनिरीक्षक सिराज पठाण, पोलीस हवालदार गणेश वाघमोडे, पोलीस नाईक भाऊसाहेब पोळ, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर कदम, आसाराम खाडे आणि अनिल भोसले यांच्या पथकाने केली.