बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर मुरुम पोलिसांनी कारवाई केली Pudhari
धाराशिव

Illegal Liquor Seized Umerga | अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा तालुक्यातील येणेगूर-सुपतगाव रस्त्यावरून बेकायदा विदेशी दारूची वाहतूक

पुढारी वृत्तसेवा

Illegal Liquor Seized on Yenegur Supatgaon Road

उमरगा : उमरगा तालुक्यातील येणेगूर-सुपतगाव रस्त्यावरून बेकायदा विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर मुरुम पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी विदेशी दारूच्या १९ बॉक्ससह कार असा एकूण ४ लाख ३३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. २३) सायंकाळी करण्यात आली.

येणेगूर-सुपतगाव रस्त्यावरून बेकायदा विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर आणि अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांच्या नेतृत्वाखाली मुरुम पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील व त्यांच्या पथकाने सापळा रचला.

२३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास संशयित वाहन येणेगूर-सुपतगाव रस्त्यावर आले. मात्र, पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागताच वाहनातील व्यक्तींनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस पथकाने पाठलाग करून सुपतगाव येथे वाहन अडवून दोघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी तपासणी केली असता ग्रे रंगाची फोक्सवॅगन व्हर्टस कार (एमएच २५ झेड ३०००) आढळून आली. या कारची अंदाजे किंमत ४ लाख रुपये आहे. कारमध्ये रॉयल इम्पॅक्ट ग्रीन व्हिस्कीच्या २३९ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत १४० रुपये असून, दारूसह वाहन असा एकूण ४ लाख ३३ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी अमर प्रकाश येडगे (वय ३८, रा. येणेगूर) आणि काशिनाथ दिगंबर देवकर (रा. करंजी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस अमलदार अमर महानुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६८/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पुढील तपास मुरुम पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT