Fraud Case : तोतया वन सचिवाकडून भाजपच्या नेत्याची फसवणूक File Photo
धाराशिव

Fraud Case : तोतया वन सचिवाकडून भाजपच्या नेत्याची फसवणूक

अपघात झाल्याचे सांगून पैसे घेतले

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News: BJP leader defrauded by a fake Forest Secretary

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : 'मी वन विभागाचा सचिव बोलत असून, माझ्या फॉर्च्यूनर गाडीचा नळदुर्गजवळ अपघात झाला आहे. मी उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहे. मला तातडीने मदत हवी आहे,' असे सांगून अज्ञात व्यक्तीने तुळजापूर भाजपच्या तालुकाध्यक्षाची सात हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद अरुण कंदले (रा. २५ तुळजापूर) यांच्या मोबाईलवर ऑगस्ट रोजी राजेंद्र पाटील या नावाने नोंद असलेल्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण महाराष्ट्र वन विभागाचा सचिव असल्याचे सांगितले.

तसेच नळदुर्गजवळ फॉर्च्यूनर गाडीचा अपघात झाला असून, आपण उपजिल्हा रुग्णालयात असल्याचे सांगत कंदले यांच्याकडे मदतीची मागणी केली. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कंदले यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावरील फोन-पे खात्यावर सात हजार रुपये पाठविले.

त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. कंदले फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT