Dharashiv News : पाच नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या वाटेवर

धाराशिव : ठाकरेंच्या पक्षात उरले केवळ दोन नगरसेवक
Dharashiv News
Dharashiv News : पाच नगरसेवक शिंदे शिवसेनेच्या वाटेवरfile photo
Published on
Updated on

Five corporators likely to join the Shinde-led Shiv Sena

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा नगर परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच नगरसेवकांचा गट लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला नगर परिषदेत मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे.

Dharashiv News
Agricultural Employees Protest : कृषी विभागाच्या प्रस्तावित आकृतिबंधाला विरोध

नगर परिषद निवडणुकीत ठाकरे गटाच्या तिकिटावर निवडून आलेल्या या नगरसेवकांनी अवघ्या आठ महिन्यांत पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. हे नगरसेवक सुरुवातीला भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती.

त्यासाठी भाजपकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. मात्र, या हालचालींची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी संबंधित नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांची मनधरणी केल्याची चर्चा आहे. त्यानंतर भाजपऐवजी शिंदे गटात जाण्याचा निर्णय झाल्याचे बोलले जात आहे.

Dharashiv News
Bhoom police action : विना नंबरप्लेट, काळ्या फ्रेमच्या वाहनांवर कारवाई

या प्रवेशानंतर ठाकरे गटाकडे नगर परिषदेत केवळ दोन नगरसेवक उरणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, नगरसेवकांची पळवापळवी म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची टीका ठाकरे गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी केली. ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघर्ष सुरू ठेवू, असे त्यांनी सांगितले-

मतदारांचा विश्वासघात ?

नगरसेवकांनी निवडणुकीत ज्या पक्षाच्या चिन्हावर मतदारांकडून मते घेतली, त्याच पक्षाला अवघ्या आठ महिन्यांत सोडून सत्ताधारी गटात जाणे योग्य आहे का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. विकासकामांसाठी सत्तेसोबत जाण्याचा दावा केला जात असला, तरी मतदारांनी दिलेल्या कौलाचा हा अनादर तर नाही ना, अशी चर्चाही शहरात सुरू आहे. या पक्षप्रवेशासाठी मोठ्या 'अर्थ'पूर्ण घडामोडी झाल्याचे सांगितले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news