दयानंद संतराम राठोड pudhari photo
धाराशिव

Dharashiv Crime : धाराशिवमध्ये तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

नातेवाईकांनी मृतदेह जिल्‍हाधिकारी कार्यालयात आणला

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून धाराशिव तालुक्यातील खानापूर येथील ३२ वर्षीय शेतकरी दयानंद संतराम राठोड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दुष्काळी परिस्थिती आणि कर्जफेडीच्या चिंतेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेनंतर नातेवाईकांनी शेतकर्‍याचा मृतदेह जिल्‍हाधिकारी कार्यालयात आणून आंदोलन केले.

राठोड यांच्याकडे चार एकर शेती असून त्यांनी यंदा शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र सोयाबीनचे पीक उगवलेच नाही. त्यामुळे शेतीतून उत्पन्न मिळण्याची शक्यता संपल्याने घरचा संसार कसा चालवायचा आणि कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत ते होते, असे नातेवाइकांनी सांगितले.

दरम्यान, शवविच्छेदनानंतर राठोड यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार कैलास पाटील आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची भेट घेऊन कुटुंबाला मदत देण्याची मागणी केली.

सिबीलचा मुद्दा उपस्थित करून राठोड यांना कर्ज नाकारण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत, वारसाला शासकीय नोकरी, कर्ज नाकारणाऱ्या बँकेवर कारवाई तसेच मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडावकर यांनी कारवाई, शासकीय योजनांचा लाभ आणि मदतीबाबत आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. राठोड यांच्या पश्चात पत्‍नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT