Mumbai APMC: मुंबईत कांदा-बटाट्याचा तुटवडा होणार? APMC मध्ये ५५ गाड्या उभ्या; माथाडी कामगारांचा माल उतरवण्यास नकार

मुंबई एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या कांदा, बटाटा भरलेल्या गाड्या खाली करण्यास माथाडी कामगारांनी आजपासून विरोध केला आहे.
Onion potato market
Onion potato marketFile Photo
Published on: 
Updated on: 

Mumbai APMC

नवी मुंबई: राजेंद्र पाटील

मुंबई एपीएमसीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या कांदा, बटाटा भरलेल्या गाड्या खाली करण्यास माथाडी कामगारांनी आजपासून विरोध केला आहे. आज (दि. 1) 88 गाडी कांदा, बटाटाची आवक झाली असून 55 गाडीतील 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा माल माथाडी कामगारांनी खाली केला नाही. यामुळे हा नाशवंत माल बाजार समिती सचिवांच्या ताब्यात देण्याचा निर्णय कांदा बटाटा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.

माथाडी संघटनेच्या भूमिकेमुळे एपीएमसीत आज कांदा, बटाटाची 50 टक्के आवक कमी झाली आहे. माथाडी संघटनेने भूमिकेत बदल केला नाही. तर उद्यापासून व्यापार बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष संजय पिंगळे यांनी 'दै पुढारी'शी बोलताना दिली.

मुंबईत दुपारपर्यंत केवळ 38 गाडी कांदा बटाटा पाठविण्यात आला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेण्याची विनंती एपीएमसी घाऊक कांदा बटाटा व्यापारी असोसिएशनने केली आहे. माथाडी कामगारांच्या या भूमिकेला घाऊक व्यापाऱ्यांचा विरोध नाही. कांदा बटाटा भरण्यासाठी लागणारे बारदाण हे 48 ते 50 किलो वजनाचे बनविण्यात यावे. जेणेकरून शेतकरी असो की स्थानिक बाजारपेठेतील दलाल, व्यापारी 54 ते 60 किलो वजनाची पिशवीत माल भरणार नाहीत. यासाठी उद्योग मंत्र्यांनी संबंधीत बारदाण (पिशवी) बनविणा-या कंपन्यांना, उद्योजकांना 50 किलो माल बसेल एवढ्या वजनाची बारदाण (पिशवी) बनविण्याचे निर्देश दिल्यास हा प्रश्न सुटेल. मात्र याकडे उद्योग विभागाचे लक्ष नाही. तर कामगार मंत्री यांच्याकडे दोन बैठका झाल्या. मात्र झालेल्या निर्णयांची अजून तरी अंमलबजावणी झाली नसल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष संजय पिंगळे यांनी सांगितले.

माथाडी कामगार संघटनेने हा निर्णय घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी माल पाठवू नका असा निरोप धुधवारी रात्रीच शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला. यामुळे आज मुंबई एपीएमसीत आज कांदा,बटाटाची 50 टक्के आवक कमी झाली आहे. माथाडी संघटनेची भूमिकेत बदल झाला नाहीतर उद्यापासून व्यापार बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार संजय पिंगळे असल्याचे स्पष्ट केले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घ्यावा. माथाडी कामगारांनी गाड्याचा खाली केल्या नाहीत तर मुंबईत होणारा कांदा,बटाटा पुरवठा ठप्प होईल. यामुळे व्यापाऱ्यांना ही माल विकणे शक्य होणार नाही.

एपीएमसीत आज 59 गाडी कांद्याची आवक झाली असून 38 गाडी माल खाली केला नाही. तर 29 गाडी बटाटा आवक झाली असून 17 गाडी माल खाली न केल्याने उभ्या आहेत. मार्केट मध्ये एकूण 55 गाडी माल भरलेली उभी आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी 50 किलोवजनाचा निर्णय घेतला. मात्र तो केवळ मुंबई मार्केट पुरताच घेतला. तोच निर्णय राज्यातील सर्व एपीएमसीला लागू करावा. याबाबत पणनमंत्र्यांनी याचा विचार करावा. राज्यात 80% युनियन नरेंद्र पाटील यांची असताना हा निर्णय फक्त मुंबईतच का? असा प्रश्न व्यापारी असोसिएशनने उपस्थित केला.

हा माल नाशवंत आहे. गाडी खाली झाली नाही तर तो खराब होईल. यात नुकसान शेतकऱ्यांचे आहे. माथाडी कामगारांच्या भूमिकेला आमचा विरोध नाही. मात्र तो स्थानिक बाजारपेठेत आणि त्या पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. बारदाण 50,55,60,65 बनते. शेतकऱ्यांना जे बारदाण उपलब्ध होते त्यात तो माल भरतो. बारदाण बनविणाऱ्या कंपनीने 48 ते 50 किलोचे बारदाण बनवावे. कामगार मंत्र्यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्वरीत उद्योग मंत्र्यांनी बारदाणाचे परिपत्रक काढावे, अशी मागणी एपीएमसी कांदा बटाटा घाऊक व्यापारी असोसिएशनने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news