व्याजदरावर संताप; आंदोलनाचा इशारा !  file photo
धाराशिव

Dharashiv News : व्याजदरावर संताप; आंदोलनाचा इशारा !

भूम नगरपालिकेकडून गाळ्यांच्या थकबाकीवर २४ टक्के व्याज आकारणी

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Anger over interest rates; Warning of Protest!

भूम, पुढारी वृत्तसेवा नगर परिषदेच्या गाळेधारक व्यापाऱ्यांवर लावण्यात येणाऱ्या तब्बल २४ टक्के वार्षिक व्याजदराविरोधात शहरातील व्यापारीवर्ग आक्रमक झाला असून हा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. याबाबत व्यापाऱ्यांनी पालिका मुख्याधिकारी व उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे.

शहरातील सुमारे ९० टक्के व्यापारी पालिकेच्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करतात. मात्र सध्याच्या आर्थिक मंदीमुळे व्यापार ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांवर बँक कर्ज, कॅश क्रेडिट व इतर देणींचा ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत पालिकेकडून थकीत भाड्यावर २४% व्याज आकारले जाणे अन्यायकारक असल्याची तीव्र भावना व्यापाऱ्यांमध्ये आहे.

विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांनी पालिकेकडे कोटी रुपयांहून अधिक अनामत रक्कम जमा केली असून त्यावर कोणताही व्याज परतावा दिला जात नाही. उलट भाडे थकीत झाल्यास मोठ्या प्रमाणात व्याज आकारले जात असल्याने संताप वाढला आहे. काही प्रकरणांत ५० हजारांच्या थकबाकीवर तेवढेच व्याज आकारल्याचे समोर आले आहे.

लवकर निर्णय न झाल्यास व्यवसाय बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे, उपाध्यक्ष नारायण बोत्रे, तसेच दीपक खराडे, जयेंद्र महिंदरगे, अरविंद शिंदे, तानाजी सुपेकर, अमोल तुळशी, रवींद्र दुगम आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते.

निर्णय मागे घेण्याची मागणी

राज्य शासनाकडून युवा उद्योजकांना अल्प व्याजदरात कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असताना, भूम नगर परिषद मात्र याला अपवाद ठरत असल्याची टीका होत आहे. गाळ्यांचे भाडे थकीत होताच तब्बल २४ टक्के व्याज लावणे म्हणजे सावकारी पद्धतीचाच अवलंब असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असून हा अन्याय तत्काळ थांबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT