Complete the process of paying account holders within two months.
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: पार्वती मल्टीस्टेट बँकेच्या खातेदारांना त्यांच्या मुदत संपलेल्या ठेवी प र त मिळण्यासाठी मोठा दिलासा मिळाला असून मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
हा लढा लढणारे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले, की खातेदारांना पैसे परत करण्यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया केवळ दोन महिन्यांत पूर्ण करावी, असे आदेश न्यायमूर्ती संदीपकुमार शिंदे व न्यायमूर्ती आबासाहेब मोरे यांच्या खंडपीठाने २३ मार्च रोजी दिले आहेत. पार्वती मल्टीस्टेट बँकेने (पुणे) लोहारा, सास्तूर, डाळिंब, कसली, सालेगाव, तुरोरी आदी भागांत शाखा उघडून जादा व्याजाचे आमिष दाखवत ठेवी गोळा केल्या. सुमारे ३० ते ३५ कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या असून एफडी व पिग्मीची मुदत संपूनही गेल्या तीन वर्षांपासून खातेदारांना पैसे मिळाले नव्हते.
त्यामुळे अनेक खा तेदार नैराश्यात गेले होते. या प्रकरणी खातेदारांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल मार्गदर्शनाखाली ७ ऑगस्ट रोजी धाराशिव येथे आंदोलन केले. त्यानंतर सप्टेंबरमध्ये उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट याचिका दाखल करण्यात आली. अवघ्या सहा महिन्यांत या याचिकेवर निकाल देत न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला.
जगताप यांच्या अॅड. अक्षरा मडके यांच्या प्रभावी युक्तिवादाची दखल घेत न्यायालयाने ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत संचालकांची चल-अचल मालमत्ता जप्त करून खातेदारांना पैसे देण्याची प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या निर्णयाच्या संरक्षणासाठी खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले असून पुढील कामकाज अॅड. सागर पाटील पाहणार आहेत. या ऐतिहासिक निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये दिलासा व्यक्त होत आहे