Nanded Protest | हिमायतनगर तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषणकर्त्याला आंघोळ घालून निषेध

कृषी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आक्रमक निषेध; रखडलेल्या देयकांवरून उपोषण तीव्र
Nanded Himayatnagar Agriculture Office protest
आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून निषेध नोंदवला.Pudhari
Published on
Updated on

Nanded Himayatnagar Agriculture Office protest

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यातील मौजे पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांची पशुधन खरेदीची देयके रखडल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे. प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून निषेध नोंदवला.

गेल्या चार दिवसांपासून ४५ शेतकरी हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत. पशुधन खरेदी योजनेंतर्गत मिळणारी देयके तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावीत, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. देयक प्रक्रियेत अनावश्यक विलंब होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Nanded Himayatnagar Agriculture Office protest
Nanded drowning case : सेल्फीच्या नादात अभियंत्याचा बुडून मृत्यू

आंदोलनकर्त्यांनी देयक वितरण प्रक्रियेत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच पोटा गावासह इतर गावांतील विविध योजनांच्या कामकाजाचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाजात पारदर्शकता न राखता कागदपत्रांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र या आरोपांबाबत प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

दरम्यान, या आंदोलनाची दखल घेत हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत हा प्रश्न अधिवेशनात उपस्थित करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या भेटीनंतर या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.

कृषी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन पुढील काय पावले उचलते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वादळी वारे, विजांचा कडकडाट, ऊन आणि पावसाची तमा न बाळगता चौथ्या दिवशीही उपोषण सुरू असल्याने आंदोलनकर्त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news