साखर गाठीसाठी पिशोरची बनतेय नवी ओळख

किरकोळ व्यापा-यांकडून मागणी वाढली, यंदा हजार क्विटल उत्पादनाचा अंदाज
pishore news
साखर गाठीसाठी पिशोरची बनतेय नवी ओळखfile photo
Published on
Updated on

Pishore is becoming a new identity for sugar gathi

पिशोर, पुढारी वृत्तसेवा: पिशोर हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते. चिकू आणि गुळासाठी प्रसिद्ध असलेले पिशोर आता साखरेच्या पारंपरिक गाठीमुळेही जिल्हाभर चर्चेत आले आहे.

pishore news
श्री घृष्णेश्वर मंदिर उद्या दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत बंद

गुडी पाडव्याला काही दिवसांचा अवधी असतानाच, माथ-फाल्गुन महिन्यातच येथे गाठी-कंगन तयार करण्यास वेग आला आहे. सिल्लोड-कन्नड मार्गावर यंदा दोन स्वतंत्र कारखाने उभारण्यात आले असून, या दोन्ही कारखान्यांवर मिळून सुमारे ३० मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. एका कारखान्यावर अंदाजे १५ मजूर काम करत असून, स्थानिकांना हंगामी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

विशेष म्हणजे, येथे गाठी-कंगन तयार करताना कोणतेही रासायनिक पदार्थ वापरला जात नाही. फक्त दूध आणि लिंबाच्या मिश्रणाने साखरेचा पाक शुद्ध केला जातो. त्यानंतर पांढऱ्या शुभ्र पाकापासून आकर्षक गाठी-कंगन आणि साखरेचे नारळ तयार केले जातात. शुद्धता आणि पारंपरिक पद्धतीमुळे पिशोरच्या गाठी-कंगन यास जिल्ह्यात मोठी मागणी निर्माण झाली आहे.

pishore news
Watermelon farming : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात कलिंगड शेतीने आणला गोडवा

यंदा उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता असून, एक हजार क्विटलचा टप्पा पार करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या गाठी-कंगनचा ठोक भाव १०० रुपये प्रतिकिलो, तर किरकोळ भाव १६० रुपये प्रतिकिलो असल्याची माहिती देण्यात आली आहे. होळी सणानंतर ग्रामीण भागात जावयांसाठी कंगन, तसेच नव्या जावयासाठी साखरेचे नारळ आणि मुलींना गाठी बाटप करण्याची परंपरा मोठ्या श्रद्धेने पाळली जाते. ही खरेदी आणि वाटपाची परंपरा गुढीपाडव्यापर्यंत सुरू असते. महिलावर्ग मोठ्या प्रमाणात गाठी-कंगन व नारळ खरेदी करून ही परंपरा जपताना दिसतो.

याबाबत अधिक माहिती देताना येथील श्यामदास वैष्णव यांनी सांगितले की, पिशोरच्या गाठी-कंगनला दरवर्षी वाढती मागणी असून, यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांकडून ठोक दरात खरेदी

यंदा परिसरातील कारखान्यांवर मिळून क्विटलहून अधिक साखरेचे गाठी-कंगन व नारळ तयार होणार असल्याचा अंदाज आहे. तसेच ३० ते ४० छोटे-मोठे व्यापारी येथे येऊन ठोक दरात माल खरेदी करून बाजारपेठेत विक्री करतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर व्यापारी हालचालींनाही चालना मिळत आहे. पुढील काही दिवस आर्थिक उलाढाल वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news