मराठवाडा

अजिंठा गावाजवळ वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अविनाश सुतार

अजिंठा: पुढारी वृत्तसेवा: सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाजवळील आनाड रोडवरील पाटाच्या पुलाखाली एका ७० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आज (दि. ६) सकाळी ६ च्या सुमारास आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटली असून सुखदेव उखडू काळे (वय ७५ रा. अमसरी, ता. सिल्लोड) असे त्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह पुलाखाली नागरिकांना दिसून आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कोथलकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह अजिंठा ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी नेण्यात आला.

रात्री पुलावरून पडल्याने डोक्याला जबर मार लागून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप कोथलकर करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT