छत्रपती संभाजीनगर : धावत्‍या बसमध्ये अचानक आग, एकच खळबळ अन्…

धावत्‍या बसमध्ये अचानक आग
धावत्‍या बसमध्ये अचानक आग

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या विनावाहक बसच्या इंजिनमध्ये अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान बसचालक आणि परिसरातील नागरिकांनी आग वेळीच विझवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी 9 वाजता दिल्ली गेट सलीमअली सरोवराजवळ घडली.

सिलोड आगाराची विनावाहक बस (एम एच 15 बी टी 2182) 35 प्रवाशी घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे सकाळी निघाली. ही बस सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिल्ली गेट सलिमअली सारोवराजवळ पोहचली असता, बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघून आग लागली. ही बाब चालक दिगंबर आहेर यांच्या लक्षात येताच त्यांनी बस रोडच्या कडेला थांबवली. प्रथम प्रवाशांना सुरक्षित बसमधून खाली उतरवून घेतले व नंतर आगीवर पाणी, माती टाकून आग विझवली. यासाठी परिसरातील नागरिकांनीही मोठी मदत केली.

दरम्यान ही घटना शॉटसर्किट आणि गाडी गरम झाल्याने घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

अधिकाऱ्याचे दुर्लक्ष…

दरम्यान चालक आहेर यांनी सिल्लोडहून बस काढण्याआधी गाडी खराब असल्याची माहिती संबंधितांना दिली होती, तरीही हीच बस
घेऊन जाण्याचे फर्मान अधिकाऱ्याने सोडल्याने चालकाने ही गाडी छत्रपती संभाजीनगरकडे आणली. सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीचे अधिकारी असा निष्काळजीपणा करत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news