छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचे निधन | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचे निधन

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रभान बंडूजी पारखे (वय ७५) यांचे आज(दि. २) दुपारी २ वाजता एकता नगर हर्सूल येथील निवासस्थानी निधन झाले.

पारखे यांची पूर्ण हयात काँग्रेस पक्षात गेली. त्यांना काँग्रेस पक्षाने औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून २००९ मध्ये उमेदवारी दिली होती. ते प्रदेश काँग्रेस पक्षाचे राज्य पदाधिकारी होते. त्यांच्यावर जळगावरोड वरील स्मशानभूमीत आज सायंकाळी ७ वाजता अंत्य संस्कार करण्यात येणार आहेत. चंद्रभान पारखे मराठवाड्यातील राजकारणाचा चालता फिरता इतिहास होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा 

Back to top button