Yuva Sena's Maharashtra tour begins from Chhatrapati Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा युवासेनेच्या संघटन बळकटीकरणाच्या उद्देशाने युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.८) महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरातून करण्यात आली.
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सरनाईक यांनी संवाद साधला. या संवादादरम्यान संघटनेची सद्यस्थिती, स्थानिक प्रश्न आणि युवासैनिकांच्या भावना जाणून घेऊन संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. सरनाईक यांनी यावेळी, युवासैनिकांच्या एकतेतच शिव- सेनेचं बळ आहे. तरुणाईच्या ऊर्जेतूनच भगवा झेंडा आणखी उंच फडकवता येईल. संघटन हेच आपलं सामर्थ्य आहे आणि त्यासाठी प्रत्येक युवासैनिकाने पुढे यावं, असे आवाहन केलं.
या कार्यक्रमात पालकमंत्री संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल यांनी युवासैनिकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, युवासेना सचिव किरण साळी, मराठवाडा सचिव निलेश शिंदे, मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, विपुल पिंगळे, ऋषिकेश जैस्वाल, युवासेना कोर कमिटी सदस्य हर्षदा शिरसाठ, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी भगुरे यांच्यासह युवासैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.