

Maratha community demands Z+ security for Manoj Jarange
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोनलाचे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या समाजकंटकांवर मकोकाअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून जरांगे यांना शासनाकडून झेडप्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी, अशी मागणी अखंड मराठा समाज व मराठा सेवा संघाने सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी (दि.७) विभागीय आयुक्त व पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सहा कोटी मराठ्यांचे श्रद्धास्थान असलेले मनोज जरांगे यांनी समाजकल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले आहे. परंतु काही समाजकंटकांनी त्यांच्या हत्येची सुपारी घेतल्याची माहिती समोर आली असून ईश्वरकृपेने मोठा अनर्थ टळला आहे.
त्यामुळे त्यांना झेडप्लस सुरक्षा देण्यात यावी. निवेदनावर, ज्ञानेश्वर कनके, डॉ. मनीषा मराठे, रुद्र वरकड, वैभव बदर, गजानन लांडगे, गोविंद खाँड, पंढरीनाथ काकडे, शारदा शिंदे, विजया पवार, लहू तुपे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.