वेदांतनगर पोलिसांनी तिघांना अटक केली. खाली बसलेले तीन आरोपी. मागे उभे पोलिस अधिकारी, कर्मचारी.. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : पदमपुऱ्यात तडीपार गुंडाच्या टोळीचा तरुणावर चाकूहल्ला

कुटुंबातील महिलांनाही मारहाण; तिघे अटकेत, एक फरार; वेदांतनगर पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : एका तडीपार गुंडाने साथीदारांच्या मदतीने दहशत माजवत एका तरुणावर भररस्त्यात चाकूहल्ला केला. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध आई आणि तिच्या सुनेलाही या गुंडांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २४) रात्री ९ वाजेच्या सुमारास पदमपुरा भागात घडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपार गुंड तुषार सुंदरलाल मेहरा (२८), त्याचे साथीदार चेतन लो लोधे, दीपक टाक आणि नीलेश गंगावणे अशी आरोपींची नावे असून, तुषार फरार झाला असून, अन्य तिघांना अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी मंगळवारी (दि. २६) दिली.

फिर्यादी मीनाबाई घनश्याम बरंडवाल (६०) यांच्या तक्रारीनुसार, त्या रविवारी (दि. २४) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घराबाहेरील शीतलामाता मंदिराच्या ओट्यावर बसल्या होत्या. यावेळी त्यांचा मुलगा अजय (३८) याने त्यांच्याकडे खर्चासाठी २०० रुपयांची मागणी केली. मीनाबाईंकडे पैसे नसल्याने त्या नकार देत असतानाच, तडीपार असलेला आरोपी तुषार मेहरा तिथे उभा राहून अजयकडे रागाने पाहत होता. विनाकारण वाद नको म्हणून मीनाबाईंनी अजयला घरी जाण्यास सांगितले. अजय घराकडे जात असतानाच तुषारने मागून पळत येत त्याला पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

हा प्रकार पाहून मीनाबाई आणि त्यांची सून संजना या अजयला सोडवण्यासाठी धावल्या. मात्र, तुषारने त्याचे साथीदार चेतन, दीपक आणि नीलेश यांना हाका मारून बोलावून घेतले. या चौघांनी मिळून त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. याच दरम्यान, तुषारने नीलेशकडील चाकू हातात घेऊन अजयच्या पाठीवर सपासप वार केले व त्याला गंभीर जखमी केले. तर चेतन लोधे याने टणक वस्तूने अजयच्या डोळ्याजवळ मारून त्याला खाली पाडले.

तुषारने अजयच्या गुप्तांगावर गुडघ्याने मारले. तसेच मीनाबाईनाही मारहाण केली. या गुंडांनी घरासमोरच्या दोन दुचाकींची सिमेंटचे गट्ठ मारून नुकसान केले. जाताना परत दिसलात तर जिवे मारू, अशी धमकी देत त्यांनी तिथून पळ काढला. दरम्यान, उपनिरीक्षक वैभव मोरे, हवालदार डोईफोडे, चव्हाण, सुलाने, मुळे यांच्या पथकाने तिघांना पकडले. फरार तुषारचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार गुजर करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT