Work on Mission Mode for Day Power Supply : Instructions of Executive Director
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी वाहिनी विलगीकरण व यंत्रणा सक्षमीकरणाची इतर आवश्यक कामे मिशन मोडवर करा, असे निर्देश महावितरणचे कार्यकारी संचालक (प्रकल्प) भुजंग खंदारे यांनी छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिले. यावेळी प्रभारी मुख्य अभियंता मनीष ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून १६ हजार मेगावॅट वीजनिर्मिती करून ती कृषिपंपांना देण्यात येणार आहे. यात सोलार पार्क उभारणी, वाहिनी विलगीकरण तसेच नवीन उपकेंद्र, उपकेंद्रातील अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ, यंत्रणा सक्षमीकरणाची कामे मिशन मोडवर करण्याचे निर्देश दिले.
या कामांच्या प्रगतीचा आढावा मुख्यालयाकडून दर आठवड्याला घेण्यात येईल. अनेक ठिकाणी दिवसा वीज पुरवण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठी सर्व कार्यकारी अभियंते व उपविभागीय अभियंत्यांनी स्वतः लक्ष घालून ही कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी दिल्या बैठकीस अधीक्षक अभियंता बिना सावंत, प्रभारी अधीक्षक अभियंता विनय घनबहादूर, कार्यकारी अभियंता राजेंद्र नाहटा, प्रेरणा बनकर, रमेश वाघचौरे, अविनाश राऊत, अशोक जाधव, प्रणाली विश्लेषक राजाराम पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.