Balwadi Teachers : महापालिका बालवाडी शिक्षकांचे तीन महिन्यांपासून थकले मानधन

स्थायीच्या मंजुरीनंतरही रखडले आदेश : २१०० कंत्राटी कर्मचारीही वेतनाविना
Balwadi Teachers
Balwadi Teachers : महापालिका बालवाडी शिक्षकांचे तीन महिन्यांपासून थकले मानधनfile photo
Published on: 
Updated on: 

Municipal corporation balwadi teachers have not received their honorarium for the past three months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐन सणासुदीच्या काळात महापालिकेच्या शाळांमधील बालवाडी शिक्षक व सेविकांच्या मानधनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने उलटले, तरी मुदतवाढीचे आदेश निघालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे तीन महिन्यांचे मानधन थकीत आहे. विशेष म्हणजे, मुदतवाढीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतरही आदेश काढण्याची कार्यवाही रखडली आहे. यासह महापालिकेच्या विविध विभागांतील सुमारे २१०० कंत्राटी कर्मचाऱ्यांचेही दोन महिन्यांचे वेतन थकीत असल्याने सणासुदीत त्यांच्यावरही आर्थिक ताण आला आहे.

Balwadi Teachers
Ganesh Visarjan Miravnuk : मिरवणुकीत चोरट्यांचा सुळसुळाटः सात महिलांचे दागिने लंपास

महापालिकेच्या शाळांमध्ये बालवाडी शिक्षक व सेविका अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना सहा किंवा अकरा महिन्यांची मुदतवाढ दिली जाते. जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, यंदा मुदतवाढीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नाही.

प्रस्ताव तयार करण्यास झालेल्या विलंबानंतर तो स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला. काही दिवसांपूर्वी समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर अद्यापपर्यंत आदेश निघालेला नसल्याने संबंधितांना मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच मुदतवाढीचा प्रस्ताव तयार करून स्थायी समिती आणि प्रशासनाची मंजुरी घेणे अपेक्षित असते. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास शिक्षक व सेविकांचे मानधन नियमित राहू शकते. मात्र, यंदा प्रस्तावाच्या प्रक्रियेलाच विलंब झाल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या मानधनावर झाला आहे.

तसेच स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतरही आदेश रखडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित हो आहेत. यावर काही शिक्षण संघटनांनी बालवाडी शिक्षकांच्य प्रश्नाकडे शिक्षण विभागाकडून दुजाभाव केला जा असल्याचा आरोप केला आहे.

Balwadi Teachers
Ganesh Visarjan 2026 वाळूज महानगरात भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप

तब्बल २१०० कंत्राटी मनपा कर्मचाऱ्यांनाही वेतनाची प्रतीक्षा

महापालिकेच्या विविध विभागांतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी सुमारे २१०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांच्या पुरवठ्यासाठी चार मनुष्यबळ एजन्सी नियुक्त आहेत. मात्र, महापालिका प्रशासन आणि संबंधित एजन्सीच्या प्रक्रियेमुळे या कर्मचाऱ्यांचेही मागील दोन महिन्यांचे वेतन खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात बालवाडी शिक्षक-सेविकांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही थकीत वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

तब्बल २१०० कंत्राटी मनपा कर्मचाऱ्यांनाही वेतनाची प्रतीक्षा

महापालिकेच्या विविध विभागांतील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी सुमारे २१०० कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांच्या पुरवठ्यासाठी चार मनुष्यबळ एजन्सी नियुक्त आहेत. मात्र, महापालिका प्रशासन आणि संबंधित एजन्सीच्या प्रक्रियेमुळे या कर्मचाऱ्यांचेही मागील दोन महिन्यांचे वेतन खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात बालवाडी शिक्षक-सेविकांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही थकीत वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे

पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन काही महिन्यांपासून थकीत

जिल्ह्यातील शाळांमध्ये माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस महिलांचे मानधन मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या अल्प मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, प्रलंबित मानधन व खर्चाची बिले तातडीने अदा करावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांचे कोलमडले आर्थिक नियोजन

बालवाडी शिक्षकांना दरमहा १२ हजार ५०० रुपये, तर सेविकांना सात ते आठ हजार रुपये मानधन मिळते. अनेकांची शाळा घरापासून दूर असल्याने ये-जा करण्यासाठी मानधनातील मोठा हिस्सा खर्च होतो. अशा परिस्थितीत तीन महिन्यांचे मानधन थकल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सणासुदीच्या काळातच मानधन रखडल्याने या कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजन करणे कठीण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news